राहुल देशपांडेंचा ‘अमलताश’ सिनेमा मोफत घरबसल्या पाहता येणार, कुठे? ते जाणून घ्या
लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी 'अमलताश' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता आणि आता प्रेक्षकांना युट्यूबवर मोफत पाहता येईल. सुहास देसले लिखित व दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा संगीतावर आधारित असून, राहुल यांच्या आयुष्यातील संगीतप्रेमी कॅनेडिअन मुलीशी जुळलेल्या सूरांची गोष्ट आहे.