“प्रेम असावं तर असं…”, ‘राजा शिवाजी’च्या सेटवर जिनिलीया रितेशची ‘अशी’ घ्यायची काळजी
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर जिनिलीया महाराणी सईबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलर लाँचला अभिनेत्री भाग्यश्रीने सेटवरील किस्सा सांगितला. रितेश दिग्दर्शक आणि जिनिलीया निर्माती असून, चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर लाँच दरम्यान रितेश-जिनिलीया भावुक झाले.