‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं, नवीन तारीख कोणती? जाणून घ्या…
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'श्री शिवराज अष्टक' मालिकेतील 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' या आगामी चित्रपटाची प्रदर्शन तारीख बदलण्यात आली आहे. आधी ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा आता ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्माते अमेय खोपकर यांनी दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होऊ नयेत याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे.