‘अशी’ होते रिंकू राजगुरूच्या दिवसाची सुरुवात, ‘त्या’ गोष्टीचा उल्लेख करत म्हणाली…
'सैराट' चित्रपटातील आर्चीची भूमिका साकारलेली रिंकू राजगुरु हिने 'व्हायफळ' पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तिच्या दिवसाची सुरुवात कशी होते हे सांगितले. ती सकाळी लवकर उठून घर साफ करते, चहा पिते, वर्कआऊट करते आणि पुस्तक वाचते. तिला वेलची, तुळस, आलं घातलेला गुळाचा चहा आवडतो. नुकतीच ती 'झिम्मा २' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.