“महाराष्ट्रात मराठीला दुसरं स्थान…”, रितेश देशमुखचे मत; म्हणाला, “वाद निर्माण करायचा…”
अभिनेता रितेश देशमुखने मराठी चित्रपटांच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्याने म्हटले की, महाराष्ट्रात हिंदी चित्रपटांना प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे मराठी चित्रपट मागे पडतात. दक्षिणेत प्रादेशिक सिनेमाला महत्त्व दिले जाते, तसे महाराष्ट्रात होत नाही. मराठी चित्रपटांच्या निर्मितीमध्ये आर्थिक तफावत असल्याचेही त्याने नमूद केले. रितेशने आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार मराठी चित्रपटांची निर्मिती सुरू केली आणि दर्जेदार चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला.