गणेशोत्सवासाठी चिपळूणला पोहोचली रुचिरा जाधव; घराच्या अंगणात केले पारंपरिक ‘बाल्या नृत्य’
अभिनेत्री रुचिरा जाधवही चिपळूणमधील मूळ गावी गणेशोत्सव केला. यावेळी तिने घरातील अंगणामध्ये बाल्या डान्स केला. या नृत्य प्रकाराला जाखडी नृत्य किंवा शक्ती-तुरा असेही म्हणतात. सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंग असलेल्या "जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले" या गाण्यावर रुचिरा थिरकली असून तिने कोकणातील मुलींबरोबर हा डान्स केला. गोलाकार पद्धतीने पारंपरिक स्टेप्स करत ती उत्साहाने यामध्ये सहभागी झाली.