संकर्षण कऱ्हाडेच्या आजोबांनी शिकवलेले ‘हे’ स्तोत्र; लहानपणीचा ‘तो’ किस्सा सांगत म्हणाला…
संकर्षण कऱ्हाडे इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत म्हणाला, "लहानपणी आमच्या आजोबांनी घरातील सर्वांना एक स्तोत्र शिकवलं होतं. आपली एखादी चूक झाली, तर आपण आपल्या आईची माफी मागतो. खरं तर कधी कधी माफी मागतही नाही. हे देवीची क्षमा मागणारं स्तोत्र आहे. आमच्याकडून काही चुकलं असेल, तर आम्हाला माफ कर आणि आम्हाला पदरात घे, असा अर्थ असणारं हे खूप सुंदर स्त्रोत्र आहे." पुढे त्याने विरचित ‘देवी अपराध क्षमापन स्तोत्रम्’ सादर केले.