“पोलिसांची गाडी आली आणि…”, शरद पोंक्षेंनी सांगितला जुना किस्सा
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक जुन्ना किस्सा शेअर केला आहे. भायंदरला राहत असताना, एकदा पहाटे चार वाजता नाटकाच्या तालमीनंतर शरद पोंक्षे रस्त्यावर मित्रांबरोबर उभे असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आणि जेलमध्ये टाकलं. याबद्दल ते असंही म्हणाले की, दोन तास आम्हाला आतमध्ये बसवलं होतं. कानाखाली वगैरे मारलं होतं. नंतर त्यांच्या शाळेचे शिक्षक पोलिस स्टेशनमध्ये आल्याने त्यांची सुटका झाली. आम्हीसुद्धा रडत रडत त्यांची माफी मागितली. मग आम्हाला सोडलं.