“आपण आक्षेप व्यक्त करतो पण…”, ट्रोलर्सबद्दल सोनाली कुलकर्णीची प्रतिक्रिया; म्हणाली…
सोशल मीडियावर अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या ट्रोलर्सबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 'इसापनिती' युट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात तिने ट्रोलर्ससाठी सामुदायिक सभा घेण्याची गरज व्यक्त केली आहे. तसंच तिने विचारले की, ट्रोलर्स फक्त नकारात्मकच का बोलतात? सकारात्मक गोष्टी का सांगत नाहीत? दरम्यान, सोनालीने ट्रोलिंगवर विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.