Video: “माझं आयुष्य…” स्वप्नील जोशीने आईच्या ७४व्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली सुंदर पोस्ट
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत नावाजलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. वयाच्या नवव्या वर्षांपासून स्वप्नील अभिनय क्षेत्रात अविरत काम करत आहेत. आजवर त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. येत्या काळातही स्वप्नील हटके भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. अशा या लोकप्रिय आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नील जोशीच्या आईचा आज ७४वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.