वर्षा उसगांवकर यांनी मानसी नाईकची काढली नजर, व्हिडीओ व्हायरल
मानसी नाईकने सोशल मीडियावर तिला पुरस्कार मिळाल्याची पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मानसीच्या या पोस्टमध्ये तिला सिनेविश्वाचा एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यांनी मानसीची नजर काढली. त्यांचा कँडिड व्हिडीओ मानसीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.