‘फू बाई फू’ फेम विकास समुद्रेंच्या ‘आत्महत्येच्या’ पोस्टनं खळबळ; नेमकं काय घडलं?
विकास समुद्रे यांनी शुक्रवारी फेसबुकवर स्वतःला जीवे मारण्याची पोस्ट लिहिली. विकास समुद्रे यांनी फेसबुकवर "मी आत्महत्या करत आहे." (I am committing Suicide) अशी पोस्ट केली होती. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची तातडीने दखल घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट लिहीत या प्रकारामुळे स्पष्टीकरण दिले. "मी आत्महत्या करीत असल्याची पोस्ट, टायपिंगमध्ये झालेल्या चुकीमुळे झाली. मी एक नाटक करतोय (I am Doing Drama) अशी पोस्ट मला करायची होती. काळजी नसावी, मी सुरक्षित आहे."