मुंबई: “२२० वर्ष जुनी एशियाटिक सोसायटी ताब्यात घ्या”, कर्मचाऱ्यांची मोदी सरकारकडे मागणी!
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. व्यवस्थापकीय समितीच्या उदासीन कारभारामुळे आणि अपुऱ्या निधीमुळे सोसायटी डबघाईला आली आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष कॉ. प्रकाश रेड्डी यांनी केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच लक्ष घालून संस्था ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन देण्यात यावे आणि सोसायटीला स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी ५० कोटी रुपयांचा राखीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.