बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: जुहू बीचवर फोटो काढण्याचा मोह आरोपींना पडला महागात!
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन आरोपींनी हल्ला केला, त्यातील दोघांना अटक झाली आहे. तपासात आरोपींची ओळख एका फोटोमुळे पटली. आरोपींनी महिनाभर रेकी केली होती. हत्यारं कुरिअरने आली होती. आरोपी उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे रहिवासी आहेत.