आरक्षण बदलांच्या प्रस्तावांना विरोध होणार, सुधार समितीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना ?
मुंबई महापालिकेच्या सुधार समितीची बैठक बुधवार, २७ मे रोजी होणार असून विविध आरक्षण बदल प्रस्तावांवर चर्चा होईल. शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसने या प्रस्तावांना विरोध करण्याची रणनीती आखली आहे. मलबार हिलमधील हरित पट्टा आणि वांद्रे रेक्लमेशनमधील क्रीडांगणाचे आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावांना विरोध होणार आहे. तसेच, उपनगरीय रुग्णालयांमध्ये खासगी संस्थांना रक्तपेढ्या चालवण्यासाठी जागा देण्याच्या प्रस्तावालाही विरोध होईल.