मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेन भारती कोण आहेत?
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९९४ च्या बॅचचे IPS अधिकारी असलेल्या भारती यांनी महाराष्ट्र पोलिस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी २६/११ हल्ल्याच्या तपासात आणि जे. डे हत्येच्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे भारती यांची नियुक्ती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.