मोबाइलवर बोलता बोलता महिलेने ८ वर्षांच्या मुलाच्या मुलाला चिरडलं, तीन तासांत अटक
मुंबईत वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओसमोर रविवारी दुपारी ८ वर्षाच्या अंश गुप्ताला भरधाव इनोव्हा कारने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. कार चालक मेघा रावल या फोनवर बोलत असताना अपघात घडला. अंशला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मेघा रावल यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.