मराठी भाषा येण्यासाठी अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांचे प्रयत्न नेमके कसे सुरु आहेत? कसं असतं वर्गातलं वातावरण?
महाराष्ट्र सरकारने मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची सक्ती केली आहे. १५ ऑगस्टपर्यंत मराठी न शिकल्यास परमिट रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक अमराठी चालक मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण कामानंतर शाळेत जाऊन मराठी शिकत आहेत तर काहीजण फोनद्वारे शिकत आहेत. प्रवाशांच्या मते, भाषा महत्त्वाची नसून चालक प्रामाणिक आणि नीट वागणारा असावा.