दिशा सालियान प्रकरणात गुन्हा दाखल, FIR मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव
मुंबईतील दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी सीबीआयकडे जबाब नोंदवून आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी केली होती. सीबीआयने एफआयआर नोंदवला असून, यात आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, सचिन वाझे यांची नावे आहेत. दिशाकडे आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे होते, असे वकील निलेश ओझा यांनी सांगितले. ८ जून २०२० रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता.