कुर्ल्यातील दरड कोसळण्याचा अंदाज ८ वर्षांपूर्वीच वर्तवला होता; मुंबईत ‘या’ ४ ठिकाणीही धोका
कुर्ल्यातील अशोक नगर परिसरातील टेकडी क्रमांक ३ वरील काही घरांवर मंगळवारी मध्यरात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून काही जखमींवर उपचार सुरू आहेत. २०१८ साली GSI ने या भागाला धोकादायक म्हणून घोषित केले होते, परंतु उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. टेकडीवरील मोठे खडक आणि मातीमुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला होता. निधीअभावी संरक्षक भिंत बांधण्याचे काम रखडले.