‘मॅनहोल दुर्घटनेसाठी अश्विनी भिडेंनाच जबाबदार धरलं जाणं कितपत योग्य?’-मिलिंद नार्वेकर
मुंबईतील साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडल्याने ५५ वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असून, उपमहापौर संजय घाडी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, आमदार मिलिंद नार्वेकर यांनी दोषी स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत, अश्विनी भिडेंना जबाबदार धरणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे.