साहिल वाकोडेच्या वडिलांचा आरोप; “माझ्या मुलाला आयआयटीने संपवलं, जातीयवाद केला”
आयआयटी बॉम्बेच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर संस्थेने प्राध्यापक सुर्यनारायण दुल्ला यांचे अधिष्ठाता पद निलंबित केले आहे. साहिलच्या वडिलांनी संस्थेवर जातीयवादाचा आरोप केला आहे. संस्थेच्या पत्रकानुसार, साहिलने परीक्षेत चॅटजीपीटीचा वापर केला होता. त्याला समुपदेशन दिल्यानंतर तो हॉस्टेलमध्ये मृतावस्थेत आढळला. साहिलच्या वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे.