एल निनोचा प्रभाव असूनही मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस का पडतोय?
१ ते ७ जुलै दरम्यान कुलाबा वेधशाळेने ७९१ मिमी पावसाची नोंद केली, तर सांताक्रुझ येथे ८७९ मिमी पाऊस झाला. एल निनो असूनही पाऊस का पडतो यावर तज्ञांचे मत आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे स्वरूप बदलले आहे. १९८१-२००० दरम्यान मुंबईत सरासरी वार्षिक पाऊस २३८५.८ मिमी होता, जो २००१-२०२४ दरम्यान २६७२.७ मिमी झाला आहे, म्हणजे १५% वाढ.