पोलिसांच्या मेहनतीची सरकारलाच किंमत नाही; विशेष सुरक्षा तर पुरवली, पण त्याचे ७ कोटी थकित!
मुंबई पोलिसांकडून व्हीआयपी व्यक्ती, सरकारी कार्यक्रमांसाठी विशेष सुरक्षा पुरवली जाते, परंतु सरकारकडून याचा परतावा मिळत नाही. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, १४ शासकीय विभागांकडून ७ कोटी १० लाख रुपये थकित आहेत. यामध्ये प्राप्तीकर विभाग सर्वात मोठा 'डिफॉल्टर' असून त्यांचे ४ कोटी ८५ लाख रुपये थकित आहेत. सुरक्षा पुरवण्याची प्रक्रिया पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार केली जाते.