मुंबई लोकल प्रवाशांची चांदी! टीसीने तिकिट तपासल्यास १० हजार जिंकण्याची संधी, योजना काय?
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने 'लकी यात्री' योजना आणली आहे. या योजनेत प्रवाशांना रोज १० हजार रुपये आणि आठवड्याला ५० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. तिकीट तपासणी अधिकारी लकी प्रवाशाची निवड करून त्यांचे तिकीट तपासतील. विनातिकीट प्रवास टाळण्यासाठी आणि प्रवाशांना तिकीट काढण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आणली आहे. ही योजना पुढील आठवड्यापासून सलग आठ आठवडे चालणार आहे.