मुंबई: मेट्रो स्थानकावर लवकरच खानपान, खरेदी आणि मुक्कामही
मुंबई: दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर - गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता लवकरच खानपानाची सोय उपलब्ध होणार आहे. तर कपड्यांसह इतर प्रकारच्या खरेदीपासून मेट्रो स्थानकात रात्रीचा मुक्कामही करता येणार आहे. दोन मेट्रो स्थानकांतील व्यावसायिक जागांच्या वापरासाठीच्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओसीएल) निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.