नवाब मलिकांना दिलासा; समीर वानखेडेंच्या अॅट्रोसिटी प्रकरणी क्लिन चीट
केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीप्रकरणी मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात पुराव्याअभावी क्लोजर अहवाल सादर केला आहे. २०२२ मध्ये मलिक यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता, परंतु पुरावा न मिळाल्याने प्रकरण बंद करण्यात आले. तपासानंतर सी-समरी अहवाल दाखल केला जातो. तक्रारदार क्लोजर रिपोर्टला आव्हान देऊ शकतो. न्यायालयाने वानखेडे यांची याचिका निकाली काढली.