विश्लेषण: मुंबई शहराला पाण्याखाली जाण्याचा धोका?
Mumbai Sea Level Rise UN Report: जागतिक पातळीवर हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम जगातील अनेक देशांतील नागरिकांवर होताना दिसत आहे. अशातच संयुक्त राष्ट्रांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात या शतकाच्या अखेरीस मुंबई शहर कायमचे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली आहे. याबाबत आता मुंबई महानगरपालिकेकडून नव्याने अभ्यास केला जाणार आहे.