४०० गाड्या, २८४३ किमी; मुंबई ते यूपी रेल्वेमार्ग अर्थव्यवस्थेला कशी देणार गती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथे 'पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर'च्या (WDFC) अंतिम तीन टप्प्यांचे लोकार्पण केले. यामुळे नवी मुंबईतील जेएनपीटी (JNPT) बंदर ते उत्तर प्रदेशातील दादरी हा १,५०६ किमीचा कॉरिडॉर पूर्ण झाला आहे. पूर्व आणि पश्चिम कॉरिडॉर (२,८४३ किमी) पूर्ण झाल्यामुळे रोज ४०० हून अधिक मालगाड्या ताशी ५० किमीपेक्षा जास्त वेगाने धावणार आहेत. या स्वतंत्र रेल्वे जाळ्यामुळे प्रवासी रेल्वेवरील ताण कमी होणार आणि मालवाहतुकीचा वेळ-खर्च वाचून भारतीय अर्थव्यवस्थेला वेग मिळणार असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.