मुंबईतील राजभवनात SRPF जवानाने स्वतःवर गोळी झाडली; कारण काय?
मुंबईतील राजभवनात तैनात एसआरपीएफ जवान कौस्तुभ सांगळे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सांगळे कोल्हापूरच्या एसआरपीएफ गट क्रमांक १६ मध्ये कार्यरत होते. प्राथमिक तपासात वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे दिसत आहे. प्रेमसंबंधातून तणाव निर्माण झाल्याचा संशय आहे. सांगळे यांच्या खोलीतून सुसाइड नोट मिळाली असून पोलीस सखोल तपास करत आहेत.