तळलेले मासे खाल्ल्याच्या संशयावरून मित्राची हत्या; खरं कारण समोर आल्यावर पोलीसही चक्रावले!
मुंबईतील गोरेगाव येथे गैरसमजातून मित्राची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरेश आणि राजेश यांनी अफसरला (वय ३५) मासे खाल्ल्याच्या संशयावरून दगडाने ठेचून मारले. मात्र, तपासात उघड झाले की मासे उंदीर खाऊन गेला होता.