जिवंत पतीला कागदोपत्री ‘मृत’ दाखवून १.११ कोटींचा फ्लॅट विकला; मुंबईतील पत्नीला बेड्या
मुंबईतील बोरीवलीमध्ये पती जिवंत असतानाही त्याचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून पत्नीने संयुक्त मालकीचा फ्लॅट विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रायन क्रास्टा यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा गैरप्रकार समोर आला. शालिनीने बनावट दस्ताऐवज तयार करून फ्लॅट तन्ना दाम्पत्याला विकला. पोलिसांनी शालिनीला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.