पोलिसांच्या उपस्थितीत परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदचा धडाक्यात वाढदिवस? VIDEO व्हायरल
अमरावती: परतवाडा पोलिसांनी मुलींना जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अयान अहमद तनवीर अहमद या १९ वर्षीय आरोपीला अटक केली. अयानचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अयानने मुलींना फिरायला नेऊन गैरवर्तन केले. त्याच्या मित्र मानव सुगंधेने फ्लॅट उपलब्ध करून दिला. या प्रकरणात आठ जणांना अटक झाली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.