अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: पीडितांमध्ये मुस्लिम तरुणींचाही समावेश
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे घडलेल्या लैंगिक शोषण प्रकरणात १९ वर्षीय मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी आठ अल्पवयीन मुली आणि महिलांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केले होते. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, एसआयटी गठित करण्याची मागणी केली आहे. मुस्लीम संघटनांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.