अमरावती जिल्हा वार्तापत्र: ‘हनुमान गढी’च्या निधीवरून आरोपांची राळ!
अमरावती: अयोध्या मंदिरांचा गड मानला जातो. त्यातील एक प्रसिद्ध हनुमानाचे मंदिर. ज्याला हनुमान गढी म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय रामललांचे दर्शन पूर्ण होत नाही, अशी श्रद्धा आहे. पण, अमरावतीनजीक देखील एक नवीन हनुमान गढी उभारली जात आहे. या ठिकाणी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकारातून हनुमानाची १११ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. धार्मिक पर्यटनासाठी महायुती सरकारने ‘हनुमान गढी’ला १२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.