अमरावती लैंगिक शोषण प्रकरणामागे मोठे ‘रॅकेट’; खासदार अनिल बोंडेंची SIT चौकशीची मागणी
अमरावतीच्या परतवाडा येथे १९ वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे. संशयितांचे मोबाईल आणि हॉटेल्सचे सीसीटीव्ही तपासण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.