वाघाच्या दहशतीतही शाळेसाठी ११ विद्यार्थ्यांची तीन किलोमीटर पायपीट
गडचिरोली: ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्या, तरी लोह खाणीतून हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला येथील विद्यार्थ्यांच्या वाट्याला मात्र आजही संघर्षच आला आहे. गावात शाळा नसल्याने येथील सुमारे ११ विद्यार्थ्यांना दररोज तीन किलोमीटरची जंगलवाट तुडवत सरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत जावे लागते.