डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी काय म्हणाले होते?
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व संवाद केंद्राने त्यांना अभिवादन केले. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांनी आंबेडकरांच्या कार्याचे कौतुक केले. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी अस्पृश्यता मिटवण्यासाठी प्रयत्न केले होते. १९३९ मध्ये पुण्यातील संघ शिक्षा वर्गात आंबेडकरांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला होता, असे संघाकडून सांगितले जाते.