विज्ञानयुगातही अंधश्रद्धेचा विळखा! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ३३ गुन्हे;
महाराष्ट्रातील नागपूर विभागात अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या फसवणुकीच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. नागपूर विभागात गेल्या पाच वर्षांत ११६ गुन्हे दाखल झाले असून, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३६ गुन्हे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा असूनही, नागरिक अजूनही भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकत आहेत.