‘काम नाही, वेतन नाही’; संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा, महसूल विभाग ठप्प!
नागपूर: जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. काही संघटनांनी संपाला समर्थन दिले नसून, शासकीय कामकाजावर परिणाम दिसून येत आहे. महसूल विभागात जास्त नुकसान झाले आहे. शासनाने संपात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व 'काम नाही वेतन नाही' धोरण लागू करण्याचा इशारा दिला आहे. कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत.