“८ महिने आधी एकत्र आले असते तर…”; उशिरा झालेल्या ठाकरे युतीवरून मनसे नेत्याचे मोठे विधान
नागपूर: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन केली. शिवसेना व मनसे एकत्र आल्यास मुंबई व मराठी माणसाला फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणुकीत याचा फारसा फायदा झाला नाही. मनसेचे हेमंत संभूस यांनी पक्ष बांधणीसाठी नागपुरात आढावा घेतला. त्यांनी पक्षात मोठे बदल होणार असल्याचे सांगितले. हिंदी सक्तीला विरोध आणि स्मार्ट सिटीच्या निधीवर प्रश्न उपस्थित केले.