Nagpur DJ Ban: सविस्तर: नागपुरातील ‘डीजेबंदी’मागचे राजकारण
पुण्यात डीजेच्या दणदणाटाविरोधात नागरिकांची चळवळ जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर ठाम भूमिका घेण्याऐवजी पुणेकरांनी आपल्या संस्कृतीनुसार गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. नागपुरात मात्र त्यांच्याच गृहखात्याच्या अखत्यारीतील पोलिसांनी थेट नोव्हेंबरपर्यंत डीजेवर बंदी घातली. विशेष म्हणजे, नागपुरात या बंदीची मागणी करणारी कोणतीही मोठी लोकचळवळ उभी राहिलेली नसताना हा निर्णय घेण्यात आला.