बनावट आधार कार्डवर अल्पवयीनांना पबमध्ये प्रवेश, नवा प्रकार किती धोकादायक ?
अल्पवयीनांना पबमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आधार कार्डावरील जन्मतारखेतच फेरफार केला जात असल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. हा प्रकार केवळ एखाद्या पबपुरता मर्यादित आहे की त्यामागे बनावट आधार तयार करणारे व्यापक जाळे आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आधारमधील माहितीमध्ये फेरफार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला असल्याचा पोलिसांचा दावा असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.