कुणी आणि कसा केला नागपूरच्या धर्मांतर सक्ती करणाऱ्या रियाज काजीचा भंडाफोड? वाचा सविस्तर
नागपूरमधील 'युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी'च्या संचालक रियाज काझीला महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव आणि धार्मिक सक्तीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भाजयुमोच्या विकी पांडे यांनी या प्रकरणाचा भंडाफोड केला. काझीवर नमाज पठण आणि रोजा ठेवण्याची सक्ती केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे नागपूर हादरले असून, विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.