Vidarbha Saline Belt Crisis: सविस्तर: खारपाणपट्ट्यावर संशोधनाची मात्रा निष्फळ!
पश्चिम विदर्भात पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाणपट्ट्याची जमीन हा व्यापक संशोधनाचा विषय ठरला. खारपाणपट्टा निसर्गनिर्मित मोठी समस्या आहे. भूजल हे पूर्णतः खारे. क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने शेतीचा पोतही खराब झाला. यावर विविध संशोधने झाली आहेत. कोट्यवधींचा खर्च झाला. खारपाणपट्ट्याची समस्या सुटेल, अशी उपाययोजना मात्र अद्याप गवसलेली नाही.