Video: “अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते”, पोलिसांची माहिती; गाडी कोण चालवत होतं?
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपूरमध्ये पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात कोणतीही गंभीर जखमी झाली नाही, परंतु वाहनांचे नुकसान झाले. सीसीटीव्ही फूटेजनुसार, चालक अर्जुन हावरे नशेत होता. पोलिसांनी अर्जुनला अटक केली असून, संकेत आणि रोनित चित्तमवार यांची चौकशी सुरू आहे. अपघातानंतर तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.