गुलाबी जॅकेटनंतर आता पैठणीच्या जॅकेटची चर्चा, अजित पवार म्हणाले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरुवात झाली. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी पवार गुलाबी रंगाचा वापर करत आहेत. येवल्यात त्यांनी पैठणी विणकरांसोबत संवाद साधला आणि पैठणी जॅकेट परिधान केले.