गोष्ट मुंबई अंडरवर्ल्डची: करीम लालाने ज्याला बेदम मारले, त्या दाऊदने मुंबई कशी काबीज केली?
करीम लालाने भरबाजारात बेदम मारल्यानंतर आणि हाजी मस्तानच्या हस्तकांनी हटकल्यानंतर पोरसवदा दाऊद इब्राहिमने मुंबई गुन्हेगारी जगतावर आपले वर्चस्व कसे निर्माण केले, याची ही रंजक कथा. ८० च्या दशकात पठाण टोळी आणि कोकणी टोळीत रंगलेला अभूतपूर्व रक्तपात, शब्बीरची निर्घृण हत्या, कोर्टातील गोळीबार आणि दाऊदने रचलेला सुडाचा प्रवास याने मुंबईचा इतिहास बदलून टाकला. करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार यांचा दबदबा मोडून काढत दाऊद मुंबईचा एकमेव 'डॉन' कसा झाला, याचा सविस्तर आढावा.