गोष्ट मुंबईच्या अंडरवर्ल्डची: धार्मिक पण तितकाच क्रूर वरदाभाई! (भाग ३)
मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्यासह स्वतःचे साम्राज्य उभे करणाऱ्या क्रूर डॉन वरदराजन मुदलियार ऊर्फ वरदाभाईची ही थरारक कहाणी. हमाली ते धारावी, अँटॉप हिलमधील अवैध धंदे अन् दहशत निर्माण करणाऱ्या वरदाच्या साम्राज्याला तत्कालीन पोलीस उपायुक्त वाय. सी. पवार यांनी कसे उद्ध्वस्त केले? अमिताभ बच्चन यांच्या हजेरीने चर्चेत राहणारा वरदाचा भव्य गणेशोत्सव आणि मद्रासला पळ काढण्यापर्यंतचा रंजक इतिहास.