अशोक सराफ यांचा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता ओटीटीवर पाहता येणार; अधिक जाणून घ्या…
२००६ मध्ये आलेल्या 'साडे माडे तीन' चित्रपटाचा सिक्वेल 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट १९ मार्च २०२६ पासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. अंकुश चौधरी दिग्दर्शित या चित्रपटात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्यासह अनेक कलाकार आहेत. चित्रपटाची कथा तीन भावांच्या गोंधळाभोवती फिरते.